Share

पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा

Published On: 

पुणे : विदर्भातील बहुतांशी भाग सध्या उष्णतेची लाट सहन करीत असतानाच हवामान विभागाने येत्या शुक्रवारपासून विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस तसेच सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने या भागात ढग साचण्याची शक्यता निर्माण झाल्याने पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान वेधशाळेनं वर्तवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ९ ते ११ एप्रिल दरम्यान वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १० व ११ एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल तसेच हिंगोली, परभणी जिल्ह्यात १० व ११ एप्रिल आणि बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!