🕒 1 min read
मुंबई : ऊसतोड कामगारांना न्याय मिळवण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी भावनिक ट्विट करून ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवण्याची विनंती केली आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 7, 2020
‘माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, कारखानदारांचे प्रतिनिधी ना.जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे.’ असे ट्विट मुंडेंनी केले आहे . ‘आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे’ असं आवाहनही पंकजांनी कामगारांना केले आहे.
‘कंगनासारखे उपरे आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन आणि पटानी अस्सल मराठी! हो ना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
