🕒 1 min read
खामगाव : कोरोनाच्या काळात जीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास, मदिरा सर्व काही खुले केले पण संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त ठेवले. त्यामुळे राज्यातील धार्मिक स्थळ व मंदिरे तात्काळ खुली करावी अशी मागणी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे.
या मागणीसाठी शनिवारी राज्यभरात सर्वत्र देवस्थाने, मंदिर, धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. संतभूमी महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरू आहे आणि भजन पूजन करणाऱ्या भाविकांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रताप ठाकरे सरकारने केला आहे असे देखील फुंडकर म्हणाले.
नागपुरात नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणा, वाचा काय आहे प्रकरण
केंद्र सरकारने ४ जून रोजी परिपत्रक काढून देशातील प्रमुख देवस्थाने सुरू करण्याचे आदेश दिले. राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांकडून होते आहे.
कुकडी कारखाना यंदाचा हंगाम ताकदीने पूर्ण करणार- राहुल जगताप
राज्यातील देवस्थानाचे धार्मिक स्थळे सुरू करून भजन किर्तन व भजन परवानगी मिळावी या मागणीकडे निद्रस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत-महंत आचार्य धर्माचार्य धार्मिक अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थाने तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडित असलेले व्यावसायिक शनिवारी राज्यात सर्वत्र देवस्थाने मंदिरे धार्मिक स्थळा समोर घंटानाद आंदोलन करणार आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वाहनावर वाळूची गाडी घालण्याचा प्रयत्न!
या आंदोलनाला महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने जाहीर पाठिंबा जाहीर केला असून, जिल्ह्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सोशल डिस्टंसिंग चे नियम व अटी पाळून विरोध प्रदर्शन करावे असे आवाहन खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. आकाश फुंडकर यांनी केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

