नाशिक : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने नाशिकमध्ये जनजीवन विसकळीत झाल्याचे चित्र आहे ,प्रत्येक नागरिकात संभ्रम हा कायम आहे ,तर याचा फायदा गोरख धंदे करणाऱ्यांनी चांगालाच घेतलाय. नाशिकमध्ये बोगस सॅनिटायझरचा मोठा साठा अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. आऊट ऑफ स्टॉक झालेला सॅनिटायझर आता बनावट पद्धतीने विकला जात असल्याचं समोर आलं आहे.
नाशिकमध्ये दोन ठिकाणी बनावट सॅनिटायझर साठा जप्त करण्यात आला होता. त्यावरून तातडीची बैठक राजेंद्र शिंगणे – अन्न औषध प्रशासन मंत्री यांच्या उपस्थितीत बोलावण्यात आली होती व तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी अश्या प्रकारची कारवाई केली जात आहे. पुण्यात ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर बनावट सॅनिटायझर तयार करून, त्याची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करून, त्यांच्याकडून दोन लाख २७ हजार रुपयांचे सॅनिटायझर जप्त केले. या प्रकरणी आणखी दोन जणांना असे आतापर्यंत पाच जणांवर गुन्हे दाखल करून, पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

