Share

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात ‘आडतास’ला उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि जगद्गुरू तुकोबाराय मराठी साहित्य परिषद आयोजित छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात गोपाळ गुंड यांच्या ‘आडतास’ या व्यक्तिचित्रसंग्रहाला उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सासवड (ता.पुरंदर) येथे दरवर्षी भरविल्या जाणाऱ्या एकदिवसीय साहित्य संमेलनात मराठी भाषा आणि साहित्यदालन समृद्ध करणाऱ्या लेखकांच्या साहित्यकृतींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या वर्षी संमेलनाचे ११ वे वर्ष होते.

संमेलनाचे उदघाटन युवराज संभाजीराजे भोसले (व्यंकोजी राजे भोसले,तंजावर यांचे १३ वे वंशज) यांच्या हस्ते पार पडले.यावेळी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेत येसूबाईंची भूमिका केलेल्या प्राजक्ता गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

कऱ्हा काठावर पार पडलेल्या ह्या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावरून साहित्य ज्योत संमेलन स्थळापर्यंत आणण्यात आली.

संमेलनाच्या निमित्ताने कथाकथन, छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्यावर परिसंवाद, एकपात्री नाट्यप्रयोग आणि कविसंमेलन असे कार्यक्रम दिवसभरात पार पडले.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!