Share

माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता

Published On: 

औरंगाबाद :  श्रीकृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळे मित्र, सवंगड्यांना आवाज दिला, अन सर्वांनी आपापल्या घराततील शिदोऱ्या घेऊन गाई चारण्यासाठी रानात गेले. दुपारी सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करून त्याचा काला केला. नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले. असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद म्हणजेच गोपालकाला असल्याचा उपदेश समाजप्रबोधनकार ह. भ. प. जयश्री महाराज तिकांडे यांनी केला. माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे नवरात्र कोजागिरीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाचा समारोप वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे त्यांच्या काल्याच्या किर्तनाने झाला, या वेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, ‘तो गोपालकाला आपल्यालाही मिळावा म्हणून देवादिक माशांच्या रूपाने येऊन यमुनेत उतरले. पण कृष्णाच्या सवंगड्यांची कृष्णावर जशी भक्ती होती, श्रध्दा होती. त्यामुळे त्यांना कृष्णाने दिलेला काला देवांना कसा मिळेल. कृष्णासह त्याच्या सवंगड्यांनी काला खाल्ल्यावर कृष्णाने त्यांना हातही धुवू दिले नाहीत. त्या काल्याचा सुवास सगळयांनी त्यांच्या घरच्यांना दिला. त्यावर तुम्ही खूप भाग्यवान आहात. साक्षात भगवंताच्या हातचा प्रसाद तुम्हाला मिळाला. आम्ही मात्र त्याला मुकलो, असे म्हणून गोकूळवासी हळहळले. त्या काल्याचा घास कृष्णाने मुखात घालता क्षणी सर्वांना अवीट रसाची गोडी चाखायला मिळाली. आजही काल्याच्या किर्तनानंतर गोपालकाला केला जातो. हा तोच गोपालकाला असल्याचे महाराज म्हणाले.

मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान आणि शिवसेना शाखा खंडाळा यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार रमेश पाटील बोरणारे, उमेश शिंदे, कचरु वेळंजकर, माजी सरपंच गोरखनाथ शिंदे, संतोष कासलीवाल, मुरलीधर थोरात, बाळासाहेब जानराव, रामभाऊ त्रिभुवन, संदिप पवार, विजय मगर, शिवाजी जाधव, ताराचंद वेळंजकर, प्रकाश वाघचौरे, अरुण जाधव, राजेंद्र जानराव, सुधीर बागुल, महेश जगदाळे आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!