मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘माणिके मगे हिते’ हे एक गाणं भरपूर ट्रेंडमध्ये आहे. हे गाणं योहानीने गायलेले असून तिचे लवकरच बॉलीवूडच्या माध्यमाने एन्ट्री होणार आहे, बॉलीवूड सिनेमासाठी गाण्याची संधी मिळाल्याने योहानीने देखील आनंद व्यक्त केलाय. या गाण्यासाठी ती पुन्हा लवकरच भारतात येणार आहे.
दरम्यान ‘माणिके मगे हिते’ हे गाणं श्रीलंकेतील सिंगिंग सेंसेशन असलेल्या योहानीने सिंहली भाषेत गायलं आहे. सोशल मीडियावरील रील्समुळे योहानीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. काही दिवसांपूर्वीच योहानीने’बिग बॉस १५’च्या मंचावर देखील हजेरी लावली होती. यावेळी सलमानने योगाही सोबत तिचं गाणं गाण्याचा प्रयत्न केला होता.
आता योहानी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली असून भूषण कुमार यांची निर्मिती असलेल्या’थँक गॉड’ या सिनेमातून की बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. या सिनेमात योहानीच्या या सुपरहिट गाण्याच्या हिंदी वर्जनचा समावेश करण्यात आला असून हे गाणं योहानीच गाणार आहे. हा सिनेमा रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमा असून या सिनेमात अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. २०२२ सालामध्ये हा सिनेमा रिलिज होणार आहे. तर या सिनेमातील योहानीचं ‘माणिके मगे हिते’ हे गाणं तनिष्कने कंपोज केलंय. रश्मी विराजने या गाण्याचे हिंदी बोल लिहिले आहेत. लकरच या गाण्याचं शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. योहानीचं हे गाणं गेल्या वर्षी मे महिन्यात यूट्यूबवर रिलीज झालं होतं. त्यानंतर ते सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं. आता आगामी चित्रपटाच्या माध्यमाने पुन्हा तिला ऐकायला चाहते उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी


