Share

मोठी बातमी : नंदीग्राममधील पराभवानंतर ममता बॅनर्जींचा धक्कादायक खुलासा…

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आलेय. ममतांना पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. भाजपचा ममता बॅनर्जींनी पार धुव्वा उडवला.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं २९२ पैकी २१३ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाचे ७७ जागांवर उमेदवार जिंकले आहेत. तर राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टीचा १ उमेदवार, तसेच एका अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे. मात्र काँग्रेस आणि डावे पक्ष निवडणुकीत आपलं खातंही खोलू शकले नाहीत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ४४ तर माकपचे २५ आमदार निवडूण आले होते.

त्यानंतर आता ५ मे रोजी म्हणजेच बुधवारी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर ६ मे राजी सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे. याप्रसंगी विजयी रॅली काढू नका, असं ममता बॅनर्जींनी आवाहन केले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ममता यांनी निवडणूक निकालाच्या दुसर्‍या दिवशी नंदिग्राममध्ये गडबड झाल्याचा दावा करत फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ‘कुणीतरी मला निरोप दिला की नंदीग्रामच्या रिटर्निंग ऑफिसरने म्हटलं की, त्यांनी जर फेरमतमोजणीचे आदेश दिले तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. राज्यपालांनीही माझे अभिनंदन केले. त्यानंतर अचानक सर्वकाही बदलले.’ असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!