Share

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा होणार विराजमान

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं आहे. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. आज ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर उद्या सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. सत्तेचा दावा करणाऱ्या भाजपला पराभूत करत ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं ममता दीदींवर पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव होतोय तर भाजपवर टीका होत आहे.

ममता बॅनर्जी या आज सकाळी १०:४५ वाजता राजभवनात शपथ घेणार आहेत. राजभवनात हा कार्यक्रम साधेपणाने केला जाणार आहे. कोरोना महामारी पाहता ममता बॅनर्जी यांनी शपथ समारंभाला 50 लोकांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!