मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. याचप्रमाणे मालेगावमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढतो आहे. यामुळे अनेक अडचणी समोर येत असल्याने लोकांचा संयम सुटत आहे.
याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालेगावच्या नागरिकांना विनंती केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.’
पुढे जलील म्हणाले, ‘मालेगावमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या व जाणारे बळी पाहता चिंतेचे वातावरण झाले आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, घराबाहेर पडू नका, असं भावनिक आवाहन जलील यांनी केलं आहे.
दरम्यान, ‘मालेगावकरांना मला हेच सांगायचे आहे की, सध्या आपण एका मोठ्या संकटातून मार्गक्रमण करत आहोत. जाणारे बळी आणि वाढणारे कोरोनाचे रुग्ण ही आपल्यासाठी काळजी वाढवणारी गोष्ट असून, जनतेने पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे,’ असं जलील यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

