Share

मुलायम ओठांसाठी करा ‘हे’ उपाय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : थंडीच्या दिवसांमध्ये ओठ फाटणे, कोरडे पडणे अशा समस्या निर्माण होतात. ओठ मुलायम कसे ठेवावे हा महत्वाचा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. आणि म्हणूनच ओठ मुलायम ठेवण्यासाठी या काही खास टिप्स.

लोणी आणि तूप हे अतिशय उत्तम आहेत. रोज रात्री झोपताना ओठांना तूप आणि लोणी लावल्यास ओठ मऊ पडतात. हलक्या हाताने लोण्याने किंवा तुपाने मसाज केल्यास ओठ फाटणे कमी होत. एरंडेल तेलाची मदत ओठ मऊ ठेवण्यास मदत होते. व्हासलीन आणि एरंडेल तेल एकत्र करून तयार केलेलं मिश्रण ओठांना दिवसातून दोनदा लावल्याने ओठ मुलायम होतात.

गुलाब पाणी हा कोरड्या ओठांन साठी अतिशय उत्तम उपाय आहे. एक चमचा गुलाब पाण्यात तीन ते चार चमचे ग्लिसरीनचे टाकून ठेवावे. दिवसातून तीन ते चार वेळा हे ओठांना लावल्याने ओठांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. लोणी आणि मीठ एकत्र करून ओठांना मसाज केल्यास ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.

कोरड्या पडणाऱ्या ओठांसाठी रात्री झोपताना व्हँसलीन आणि लिंबाचा रस एकत्र करून लावला. तसेच शेंगदाण्याचे तेल ही ओठांसाठी फायदेशीर ठरते. शेंगदाण्याच्या तेलाने ओठांची मसाज करावी आणि नंतर सुती कापडाने पुसून घ्या. यामुळे ओठ मऊ होतील.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!