Share

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक कोटी सदस्य असलेला पक्ष बनवणार ; रामदास आठवलेंचा निर्धार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : रिपब्लिकन पक्षाचे येत्या मार्च महिन्यापर्यंत पाहिल्या टप्प्यात देशभरात १ कोटी सदस्य बनविण्याचा निर्धार करण्यासोबतच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला द्यावे असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्याकरिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच भारतात आले तेंव्हा त्यांनी ताजमहाल भेट दिली तसेच महात्मा गांधींच्या समधीस्थळा ला भेट देऊन अभिवादन केले त्याप्रमाणे परदेशी पाहुणे जेंव्हा शासकीय भेटीवर भारतात येतात तेंव्हा त्यांनी महात्मा गांधींच्या समधीस्थळा ला भेट देऊन अभिवादन करतात तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नविदिल्लीतील २६ अलीपुर रोड येथील स्मारक आणि मुंबईतील चैत्यभूमी येथील स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले पाहिजे.रिपाइंची ही मागणी पक्षाध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपर्यंत पोहीचवावी असा ठराव आज रिपाइं च्या राज्य कार्यकारिणी च्या बैठकीत संमत झाला.

रिपाइंच्या पक्ष संघटनेच्या अंतर्गत निवडणुका येत्या एप्रिलमध्ये घेण्यात येईल. गाव शाखा वॉर्ड स्तरावर ८ सदस्यांची कमिटी ; तालुक्यामध्ये १९ सदस्यांची कमिटी ; जिल्ह्यात ३२ सदस्यांची कमिटी आणि राज्य कमिटी मध्ये ६८ लोकांची निवडण्यात येईल असे ना रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी रिपाइं चे अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, भूपेश थुलकर, राजाभाऊ सरवदे, बाबुराव कदम, पप्पू कागदे;गौतम सोनवणे; प्रकाश लोंढे ,प्रियकीर्ती त्रिभुवन, सुरेश बारशिंग, अण्णा रोकडे; कन्नन, ऍड.आयुब शेख,बी बी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!