Share

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावण्याचे ठाकरेंनी टाळावे : राष्ट्रवादी

Published On: 

नवी दिल्ली- श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती यानंतर चांगलेच राजकारण तापले.

भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून भाजप व महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी राष्ट्रवादीसोबतच भाजपनेही घेतली असल्याचे सांगितले जाते. यातच आता राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चक्क एक सल्ला देण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आहे. मात्र, त्यांनी या सोहळ्याला जाणे टाळावे’, असा थेट सल्ला आता राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला आहे.

‘उद्धव ठाकरे यांना अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यामुळे, ते वैयक्तिकरित्या या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करून उद्धव ठाकरे पूर्णपणे आपल्या वैयक्तिक क्षमतेत या सोहळ्याला हजेरी लावू शकतात. मात्र, एका धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे प्रमुख या नात्याने त्यांनी कोणत्याही विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाला चालना देणे टाळावे’, असे माजिद मेमन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांना चिमटा काढला आहे.राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाले आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या पायाभरणीसाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेचा ‘हा’ धडाकेबाज आमदार अडकला कोरोनाच्या विळख्यात,मंत्र्यांसह कार्यकर्त्यांची चिंता वाढली

दुध दरवाढीसाठी स्वभिमानीचे आक्रमक आंदोलन

दूध दर आंदोलन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात

‘मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!