Share

पूर्वसूचना न देता मका खरेदी प्रक्रिया बंद; पणन महामंडळाच्या कारभारावर शेतकरी संतप्त….

Published On: 

गंगापूर- शेतकऱ्यांनी गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादित केलेला मका खरेदी करण्यासाठी शासनाने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ५ जून पासून खरेदी प्रक्रियेला सुरवात केली होती. त्यापूर्वी प्रत्येक तालुका स्तरावर खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातुन यासाठी नियोजन करण्यात आले होते. मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येऊन त्यांना टोकन देण्यात आले होते. मात्र शासनाचे मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी प्रक्रिया पणन महामंडळाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आली. याचा फटका गंगापुर तालुक्यासह राज्यभरातील मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

तालुक्यातील १ हजार ८२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यापैकी ४५० शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात आली तर ६३२ शेतकऱ्यांची मका शिल्लक आहे परंतु खरेदी प्रक्रिया शासनाकडूनच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी मका भरुन सुमारे दोनशे वाहने आणून ऊभी केली होती.

खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये तिव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला धडक देत आमची मका खरेदी करा नाहीतर आम्ही मक्याची वाहने तहसील कार्यालयात आणून त्यावर बसून स्वतःला पेटवून घेऊ असा इशारा दिला आहे. आता यावर शासन मका खरेदी करणार कि नाही या कडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

नवे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते?

मोठी बातमी : आयआयटीच्या कोविड किट्सला आयसीएमआरची मान्यता

अखेर ‘तो’ निर्णय रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला

मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ, वॉरन बफेंना मागे टाकत पोहचले ‘या’ क्रमांकावर

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!