Share

कोपा अमेरिका: २८ वर्षानंतर अर्जेटिनाने पटकावले जेतेपद; ब्राझीलचा १-० ने पराभव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : फुटबॉल विश्वातील मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जात असलेली कोपा अमेरिका २०२१ आज संपुष्टात आली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा १-० अशा पराभव केला. २८ वर्षानंतर अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

ब्राझीलमध्ये रिओ डि जेनेरियो शहरातील मारकाना मैदानात हा सामना पार पडला. या सामन्यात अर्जेंटिनाचा फुटबॉलपटु एंजेल डि मारियाने केलेला एकमेव गोल या सामन्यात निर्णायक ठरला. तब्बल २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यापुर्वी अर्जेंटिनाने १९९३ साली ही स्पर्धा जिंकली होती.

१९९३ नंतर २०१५ आणि २०१६ साली झालेल्या स्पर्धेत अर्जेटिनाने अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यावेळी संघाचे नेतृत्व दिग्गज फुटबॉलपटु लियोनल मेस्सीने केले होते. मात्र यावर्षी अखेर मेस्सीचे स्वप्न पुर्ण झाले. मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच पहिल्यांदा मोठी स्पर्धा जिंकली आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेटिनाचा संघ २०१४च्या फीफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र जर्मनीकडुन पराभूत झाल्याने मेस्सीचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!