Share

‘कोरोना’चा फटका : राज्यातील ६०० भाविक अडकले तेहरानमध्ये

Published On: 

मुंबई : चीनमध्ये लागण झालेल्या कोरोना व्हायरसचं संकट जगभर पसरले आहे. ३१ जानेवारी रोजी हे भाविक तेहेरानमध्ये पोहोचले होते. तेहेरान जवळच्या कुम या शहरात सर्व भाविक अडकून पडले आहेत. ६०० भाविकांमध्ये सोलापुरातील ४४ जणांचा समावेश आहे. तीर्थयात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल सहाशे यात्रेकरू इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत.

तसेच इराकची राजधानी बगदाद येथे प्रसिध्द सुफी संत हजरत गौस पाक जिलानींचा दर्गाह तसेच मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमामहुसेन व त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या करबलाच्या युध्दात हौतात्म्य पत्करले तेथील स्थळांचे दर्शन घेण्यासाठी हे यात्रेकरू गेले होते. यापैकी बहुसंख्य यात्रेकरू तेहरान शहरात हॉटेल जिबा येथे गेल्या आठ दिवसांपासून ताटकळत थांबले आहेत.

याचप्रमाणे इराणमध्ये धार्मिक तीर्थयात्रेला गेलेले जवळपास 2 हजार मुस्लीम भाविक तेहरानजवळ अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्रातील 44 भाविकांचा समावेश आहे. यानंतर या प्रवाशांची तेथून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी धडपड सुरु आहे.

दरम्यान, भारताने कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून इराणमधील विमानांना भारतात उतरण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे सर्व भाविक मागील 8 दिवसांपासून तेहरान परिसरात अडकून पडले आहेत. अकलूज, सांगोला, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागातील 44 भाविक कोल्हापूर येथील साद ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे धार्मिक यात्रेसाठी गेले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!