मुंबई : महाराष्ट्र राज्याचा २०२१ -२२ या वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
सिंधुदुर्ग,उस्मानाबाद,रायगड,साताऱ्यात शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्याची मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. कोरोना संकटामुळे महारष्ट्रातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टीने सरकारने एक मोठे पाऊल उचल्याचे या निमित्ताने दिसत आहे.
कोरोनाचा कहर आणि लॉकडाऊन यामुळे राज्याच्या महसुलात घट झाली आहे. राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूटही वाढली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला अच्छे दिन येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आज जागतिक महिला दिन असून अर्थसंकल्पाच्या वाचनास सुरुवात करताना अजित पवारांनी महिलांच्या कार्यास सलाम केला आहे. कोरोना काळात नर्सेसच्या रूपात महिलांनी रुग्णांची सेवा केली. राज्याच्या विकासात देखील महिलांचं फार मोठं योगदान आहे, असं सांगतानाच त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

