मुंबई : काल ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी प्रशासनात नसलेला समन्वय, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त काढत असलेले परस्पर विरोधी आदेश आणि घेत असलेल्या निर्णयांबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच यावेळी या बैठकीत मंत्र्यांनी ‘कोणताही निर्णय घेताना निर्णय प्रक्रियेत मंत्र्यांना सहभागी करुन घेतलं जात नसल्याची तक्रार मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
सध्या देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त परस्पर वेगळाच निर्णय घेतात. कोणी काही तासांसाठी दुकानं सुरु ठेवतो, तर कोणी एक दिवसाआड, यामुळे राज्यात गोंधळ उडत असल्याचंही मंत्र्यांनी सांगितलं.
वाचा राज्यातील कोरोना स्थिती…
महाराष्ट्रात काल कोरोनाच्या 1,233 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 758 झाली आहे. काल राज्यात 275 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 3 हजार 094 रुग्ण बरे झाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
