टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यात सर्वत्र परतीच्या पाऊसाची धूम सुरू आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सध्या शेतीतील पीक काढणीचा हंगाम सुरू असताना, पावसामुळे सोयाबीन,कापूस, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशात तामिळनाडू पासून राजस्थान पर्यंत द्रोणीय रेषेमुळे राज्यात मान्सून सुरू झाला असून कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर तामिळनाडू पासून ते ईशान्य राजस्थान पर्यंत पाऊसाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे.
राज्यात या भागांत पुढील काही दिवस परतीच्या पाऊसाची धूम
हवामान खात्याचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यापी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस परतीच्या पावसाची धुमाकूळ बघायला मिळणार आहे. तर, विदर्भातही पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. 13 ते 14 ऑक्टोबरनंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात परतीच्या पाऊसाची हजेरी
पुण्यात काल संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर पुण्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर संध्याकाळच्या दरम्यान मेघगर्जेनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शहरात गेले 2 दिवस ढगाळ वातावरण होते, पण तरी पाऊस नव्हता. मात्र काल (सोमवारी) झालेल्या अचानक पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून वाहतुकीमध्ये सुद्धा अडथळे निर्माण झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- Shahajibapu Patil | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यावर शहाजीबापू पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका
- Sanjay Raut | निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, कोर्टाबाहेरुन म्हणाले…
- Shivsena । शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य एकनाथ शिंदे या गारद्याने केले; शिवसेनेचे टीकास्त्र
- Anil Parab | धगधगती मशाल सगळ्यांना जाळून टाकेल, अनिल परबांचा विरोधकांना इशारा
- Shivsena । येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे; शिवसेनेचा सामन्यातून हल्लाबोल


