मुंबई : देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना पाह्यला मिळत आहे. आता कोरोनाच्या विळख्यातून जनतेसाठी रात्रंदिवस झटणारे पोलिस देखील सुटलेले नाही. महाराष्ट्रात 361 पोलीस कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे.
आज जवळपास 19 पोलिसांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 342 वरुन 361 वर गेली आहे. यामुळे आता चिंतेत आणखीनच भर पडली आहे. कारण 3 पोलिसांनी आपला जीव गमावलेला आहे.
दिलासादायक म्हणजे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांपैकी 49 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 309 पोलिसांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. एका रात्रीत तब्बल 68 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या 1 हजार 980 वर गेली आहे. भवानी पेठेतील रुग्णसंख्येने साडेतीनशेचा टप्पा ओलांडला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

