Share

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे निकाल जाणून घेण्यासाठी क्लीक करा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील लढतीना काल दि.३ पासून सुरुवात झाली आहे. काल सकाळ व संध्याकाळच्या दोन सत्रात ५७ व ७९ किलो वजनी गटातील पाच फेऱ्या झाल्या. तर माती विभाग मधील अंतिम लढती झाल्या असून गादी विभागाच्या दोन गटातील लढती आज सकाळच्या सत्रात होतील.

५७ किलो वजनी गटातील चित्त थरारक लढतीत आबासाहेब अटकळे यांनी मारली बाजी 

५७ किलो वजनी गटात माती विभागात आबासाहेब अटकळे याने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम फेरीसाठी आबासाहेब अटकळे व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये रंगतदार लढत झाली. सहा मिनिटाच्या लढतीत दोघांचे ही ८-८ असे बरोबरीत गुण झाले होते. पण आबासाहेब यांनी शेवटचा गुण मिळविल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
५७ किलो अंतिम निकाल
१)आबासाहेब अटकळे
२) रमेश इंगवले
३)संकेत ठाकुर
४) अतिष तोडकर

७९ किलो माती विभागात हणमंत पुरीची सुवर्ण कामगिरी

चार कुस्त्या करून अंतिम फेरीत धडक मारलेल्या पैलवाम हणमंत पुरी (उस्मानाबाद) व पैलवान सागर चौगुले (सोलापूर जिल्हा ) यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सागर वरती ५ विरुद्ध ० अशा गुण फरकाने विजय मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर कांस्य पदकाच्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदे याने परभणीच्या गिरिधारी दुबे यावर ८-२ अशी मात केली.

७९ किलो गादी विभागाच्या उपांत्य लढतीत रामचंद्र कांबळे (सोलापूर) याने कोल्हापूर शहराच्या निलेश पवार वर १३ विरुद्ध ४ गुणांच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तर दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या रवींद्र खरे याने श्रीधर मुळे (सातारा) याच्यावर ४ विरुद्ध १ अशा गुण फरकाने मात देत अंतिम फेरी गाठली. सकाळच्या सत्रात रामचंद्र कांबळे विरुद्ध रवींद्र खरे यांची गादीवरील लढत होणार आहे. तर ५७ किलो गटात जोतीबा अडकळे याने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

गादी विभागातील ७९ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या रामचंद्र कांबळे याने उस्मानाबादच्या रविंद्र खैरे याचा १४-३ गुणाधिक्याने पराभव करून सुवर्ण पदकावर आपली मोहोर उमटवली, तर रविंद्र खैरेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

७९ किलो अंतिम निकाल या प्रमाणे
१) रामचंद्र कांबळे
२) रविंद्र खैरे
३) केवल भिंगारे
४) श्रीधर मुळीक

गादी विभागातील ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे याने कोल्हापूरच्या रमेश इंगवले याला चारीमुंड्या चितपट करून सुवर्ण पदक पटकाविले, तर रमेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.तर पुणे शहरातील संकेत ठाकुर याने तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूर शहराच्या साईराज चौगुले याचा १०-० आशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्य पदक जिंकले.

७९ किलो (माती विभाग)
सुवर्ण – हणमंत पुरी
रौप्य – सागर चौगुले
कांस्य – धर्मा शिंदे
तर ५७ किलो वजनी गटात
सुवर्ण – आबासाहेब अटकळे
रौप्य – संतोष हिरुगडे
कांस्य – ओंकार लाड

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!