🕒 1 min read
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली. मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. आता नितीन गडकरी यांनी विनायक मेटेंच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते. अनेक वेळा त्यांची आणि माझी भेट झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे. त्यांचा अपघाती निधन हे महाराष्ट्रचं मोठा नुकसान आहे. आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला आहे. रस्त्यावर अपघात होतात. लोक मृत्युमुखी पडतात. पण सर्वांनी आता संवेदनशील नागरिक बाण्याला पाहिजे. या अपघाताचा नेमकं कारण काय हे मला माहीत नाही. मात्र आपल्यला संपूर्ण भारताला अपघात मुक्त केला पाहिजे हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली होईल. विनायक मेटे यांच्या आत्म्याला शांती मिळो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशा शब्दात नितीन गडकरी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
महत्वाच्या बातम्या :
- chandrashekhar bawankule on vinayak mete | कालच आमचं बोलणं झालं, निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाही- चंद्रशेखर बावनकुळे
- Vinayak Mete Accident | मेटेंचा अपघात की घातपात?, संपूर्ण अपघात प्रकरणाची चौकशी केली जाईल; शिंद-फडणवीसांचे आश्वासन
- Vinayak Mete: ‘मदत मागत होतो पण कोणी आलं नाही’; मेटेंच्या ड्रायव्हरचा गंभीर आरोप
- Vinayak Mete Passes Away। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं संघर्ष करणारा नेता हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Vinayak Mete Accident | विनायक मेटेंच्या निधनाचे दु:ख हे शब्दामध्ये सांगण्यासारखे नाही – विनोद तावडे


