Share

महाराष्ट्र थांबला नाही, थांबणारही नाही; सुभाष देसाईंचे विरोधकांना प्रत्युत्तर!

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav thackrey) यांच्या नेतृत्त्वाखाली मागील दोन वर्षात राज्याने विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणारही नाही, असा संदेश देत औरंगाबादच्या विविध विकासकामांना शासनाने गती देऊन ते पूर्णत्वास नेले आहेत. प्राधान्य देऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना दिल्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash desai) यांनी सांगितले.

शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस अधीक्षक निमित गोयल यांची उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई म्हणाले, एमसीइडीमध्ये वस्तीगृह विस्तारीकरण केले आहे. यामध्ये आता ३०० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण मिळणार आहे. १०० निवासी प्रशिक्षणार्थी याठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतात, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरात असलेल्या ऑरिक सिटीमध्येही विविध कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. राज्यासह औरंगाबादेत कंपन्यांच्या गुंतवणुकीचा वेग वाढलेला आहे.

ऑरिकमध्ये रिक्त सभागृह कंपन्यांसाठी देऊ केले आहेत. एकूणच उद्योग क्षेत्राला आवश्यक व पूरक वातावरण औरंगाबादेत निर्माण करण्यात आलेले आहे. शिवाय दळण वळणाचा विचार करताना औरंगाबाद-नगर लोहमार्ग यासाठी पाठपुरावा सुरू असून रेल्वे मंत्रालयाने याबाबत कामही सुरू केलेले आहे. त्याचबरोबर औरंगाबादहून पर्यटक, भाविकांना शिर्डी अधिक जवळ व्हावे यासाठीही राज्याच्या उपराजधानी आणि राजधानीला जोडणारा हिंदूऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याचा (समृद्धी महामार्ग) काही भाग मिळून ए.एस.क्लब माळीवाडा मार्गे शिर्डी रस्त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडले जाणार आहे. शासनाच्या महत्त्वकांक्षी असलेल्या समृद्धी महामार्गातील नागपूर-शिर्डी रस्त्याचेही लवकरच लोकार्पण होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!