Share

महाराष्ट्र देशा इम्पॅक्ट : आमदार धावले शेतकरी उपोषणकर्त्यांच्या भेटीला

Published On: 

पुणे: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असणाऱ्या मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अन्यायामुळे गोरक्षनाथ साळुंखे या शेतकऱ्यावर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याची वेळी आली आहे. आज ‘महाराष्ट्र देशा’ने सर्व प्रथम हे वास्तव पुढे आणले, त्यानंतर नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तातडीने शेतकरी कुटुंबाची भेट घेतली आहे.

पहा या शेतकरी कुटुंबाची व्यथा 

काय आहे प्रकरण

नेवासा तालुक्यातील कांगोनी येथील शेतकरी गोरख साळुंखे यांनी विरोधी पक्षात काम केले म्हणून मुळा कारखान्याकडे नोंद असतानाही कारखाना प्रशासनाने त्यांच्या ऊसाला तोड दिलीच नाही. गोरख साळुंखे यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती हि अतिशय हालकीची असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच उसावर होणार होता. ऊसाल तोड येईल व पाच पैसे मिळतील अशी आशा होती. सदर घटनेप्रकरणी शेतकरी साळुंखे यांनी कारखाना प्रशासनाला ऊसाला तोड मिळण्यासाठी संपर्क साधला असता शेतात गाड्या जाणारच नाही, थोडं थांबा, तर कधी थेट ऊसाला तोड मिळणारच नाही अशी उडवाउडवीची उत्तरे कारखाना प्रशासनाने दिली.

महाराष्ट्र देशा इम्पॅक्ट : आमदार धावले शेतकरी उपोषणकर्त्यांच्या भेटीला

दरम्यान, याविरोधात शेतकरी साळुंखे यांनी साखर आयुक्तालयात धाव घेतली आणि अडीच एकराचा ३ वर्षाचा मोबदला या शेतकऱ्याला अवघे २५ हजार रुपये मिळाला. त्यामुळे मागील ३ वर्षापासून अन्याय सहन करणाऱ्या या शेतकऱ्याला अखेर २३ मार्च पासून न्यायची हाक मारण्यासाठी पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणास बसाव लागलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!