नवी दिल्ली : भारतीय सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. याच हल्ल्यात भारताचे आणखी १७ जवान जखमी झाले होते. परंतु त्या परिसरात शून्याखाली असलेल्या तापमानामुळे ते वाचू न शकल्याने शहीदांची संख्या २० झाली. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे ४३ सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. हा तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि सैन्यप्रमुखांची दोनवेळा चर्चा केली.
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, गवलान खोऱ्यातील पॅट्रोलिंग पॉर्इंट १४ पाशी सैन्य माघारीची सुरू असताना दोन्हीकडील सैनिकांत हा संघर्ष झाला. त्यात दोन्ही बाजूचे जवान मृत वा जखमी झाले. मात्र लष्कराने भारताचे किती जवान शहीद झाले, हे स्पष्ट केलेले नाही. दोन देशांच्या सीमेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. मात्र भारतीय लष्कर वा परराष्ट्र मंत्रालयाने आपले एकूण २० जवान शहीद झाल्याचे मान्य केले आहे. सीमेवर चीनच्या या कागाळीमुळे देशभर संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, लहानसहान गोष्टींवर ट्वीट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत! पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र कॉंग्रेसने केली आहे.
लहानसहान गोष्टींवर ट्वीट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत!
पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे.#WeakestPMModi
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 16, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

