Share

महाराष्ट्र विधानसभा उद्या बरखास्त होणार ?, लोकसभा – विधानसभा निवडणूक एकत्र

Published On: 

मुंबई : लोकसभासोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्याचं दिसत आहे. उद्या तातडीने राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा मुदतपूर्व भंग करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पुढील आठ दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र विधानसभा देखील बरखास्त करून दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची चर्चा सुरु आहे.

मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या होण्याऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय चर्चिला जाणर आहे. तसेच आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख नेत्यांच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मागील चार दिवसांमध्ये सरकारकडून अनेक महत्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. तसेच आज आणि उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास ५० लोकप्रिय निर्णय घेतले जाणार असल्याचं बोलल जात आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!