Share

भाविकांना दिलासा! ‘हे’ शिवालय देणार घरपोच महाप्रसाद

Published On: 

बीड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने काही निर्बंध लावली आहेत. त्यामुळे यावेळी महाशिवरात्रीच्या पर्वात भाविक मोठ्या क्षमतेने शामिल होऊ शकले नाहीत. महाप्रसादासाठी बसणारी महापंगत स्थगित करून प्रसाद थेट घरपोच करण्याचा निर्णय सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी जाहीर केला. शिरूरसह संस्थानला जोडली गेलेल्या वीस गावातसुद्धा हा प्रसाद पोहच केला जाणार असल्याचे सांगितले.

संत आबादेव महाराज यांनी सुरु केलेल्या महाशिवरात्र सोहळ्याची ४३ वर्षांपासूनची परंपरा अखंडित होऊ देता मोजक्याच भाविकांनी ही परंपरा जतन केली. शुक्रवारी विद्यमान महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी काल्याचे कीर्तन अवघ्या अर्ध्या तासात उरकले व दहीहंडी फोडून काला झाला. या सप्ताहाचे २०३४ सालापर्यंतचे महाप्रसाद श्रीफळ देण्यात आलेले आहेत.

यावर्षी दिंडी प्रदक्षिणेलाही फाटा देण्यात आला. रांगोळी, महंतांचे पाद्यपूजन, सवाद्य मिरवणूक आणि टाळमृदंगाचा गजर यंदा अनुभवायला मिळाला नाही. शिरूरसह दहीवंडी, झापेवाडी, कान्होबाची वाडी, कोळवाडी, भालगाव, आनंदगाव, पाडळी, बावी, तागडगाव, नागरे वाडी, वार्णी, लोणी, भगवाननगर, एकनाथ वाडी, उत्तमनगर, कासळवाडी, चुंभळी, ढोकवड, जांभळी आदी गावे या संस्थानला जोडलेली आहेत. ४३ वर्षांपासून सातत्याने ते आपले योगदान देत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!