Share

एक पठ्या निघालाय थेट सूर्यावर केस करायला, जाणून घ्या का ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सूर्याच्या उष्णतेने संतापलेल्या एका व्यक्तीने थेट ‘सूर्या’विरोधात कारवाई करा अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यात ही घटना असून शिवपाल सिंह असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

यंदाच्या वर्षी उष्णतेची प्रखर लाट होती. गेल्या अनेक वर्षात नव्हतं एवढं उन्ह यावर्षी अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रखर उष्णतेची लाट पाहायला मिळाली. या प्रखर उष्णतेमुळे नागरिक घामाच्या धारांनी त्रासून गेले होते तर अनेक जणांचे प्राणही गेले होते.

याचदरम्यान, मध्यप्रदेशातल्या अशाच एका उष्मा पीडित नागरिकाने थेट ‘सूर्या’विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दिवसेंदिवस ‘सूर्या’चा प्रकोप वाढतोय, भीषण गर्मी आहे, जगण असह्य झालंय, अनेकांचा जीव गेलाय, अशा परिस्थितीत जगायचं कसं? असा सवाल शिवपाल सिंह या नागरिकाने पोलिसांना विचारला. इतकेच नव्हे तर, सूर्या’विरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, पोलिसही या तक्रारीमुळे अचंबित झाले आहेत. आता ‘सूर्या’विरुद्ध कुठल्या कलमाखाली कारवाई करायची असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!