मुंबई : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राज्याच्या कृषी सुधारणा विधेयकावर सुमारे तासभर चर्चा केली.
या भेटीनंतर दादाजी भुसे म्हणाले, ‘पिक विम्याच्या संदर्भात केंद्र सरकारची नियमावली देशभर लागू आहे, यावर्षी पिक विम्यात ५८०० कोटी जमा झाले. शेतकऱ्यांना त्यातुन ८०० ते एक हजार कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी मिळाले. खासगी विमा कंपन्यांना 5000 कोटी रुपयांचा नफा झाला. हे अन्यायकारक आहे या संदर्भात आम्ही वारंवार केंद्र सरकारबरोबर संपर्क केला आहे. मी स्वतः केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटलो आहे. कालही मुख्यमंत्री महोदय यांनी पंतप्रधान यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला आहे.’
‘विमा कंपन्यांच्या नफ्याला मर्यादा घालण्याबाबतचे मॉडेल लागू करण्याचा विचार आम्ही करतो आहोत. बीड जिल्ह्यात आम्ही हे मॉडेल सुरू केले. आम्हाला त्यात यश मिळाले. आज शरद पवार यांनी देखील या विषयावर चर्चा झाली. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या आहेत. केंद्र सरकारने लवकरात लवकर राज्याला बीड मॉडेल राबविण्यासाठी परवानगी द्यावी, ही सरकारची भूमिका असल्याचे आम्ही पवार साहेबांना सांगितले.’ असेही भुसे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला’; राकेश टीकैतांचा घणाघात
- शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत पैठण शहरात अवैध प्लॉटिंगचा व्यवसाय तेजीत
- ‘मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी “ही” कोणाची जबाबदारी ?’
- गोरोबाकाकांच्या घराबाबत प्रशासनाचा संतापजनक कारभार, जुना बाजही गेला आणि पत्र ठोकून सौंदर्यही घालवले
- काँग्रेस आता एका कुटुंबाचा पक्ष होतोय; महिला काँग्रेस आमदाराचा घरचा आहेर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
