Share

पोलिस असल्याचे सांगून ६० हजार रुपयांचे दागिने लुटले

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर –  अाम्ही गुन्हे शाखेचे पोलिस अाहोत. दागिने घालून कुठे जात अाहात. काढून ठेवा असे सांगून दोघा तरुणांनी ६० हजार किमतीचे दागिने काढून घेतले व पळून गेले. जंबकुमार मोहनलाल फडे (वय ७२, रा. नवी पेठ, पंढरपूर) यांनी विजापूर नाका पोलिसात तक्रार दिली अाहे.

फडे हे डी-मार्ट ते अंबर हाॅटेलच्या दिशेने जात होते. काही कामासाठी ते सोलापुरात अाले होते. या भागातून जाताना त्यावेळी दोघे तरुण त्यांच्याजवळ अाले. एक तरुण दुचाकीवर पुढे जाऊन थांबला. एकजण त्यांच्यासोबत बोलत थांबला. वरील थाप मारून दागिने काढून घेऊन बांधून देण्याचा बहाणा करून दोघेजण दुचाकीवरून पळून गेले. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली.

फौजदार चौगुले तपास करीत अाहेत. डी-मार्ट ते अंबर हाॅटेल या मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अाहेत. ही घटना कैद झाली अाहे का? याची तपासणी करावी. झाली असल्यास त्या अाधारे पोलिस तपास होऊ शकतो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!