Share

पुनश्च हरिओम : राजकारणातील ‘हा’ धुरंधर बाहुबली नेता होणार राष्ट्रीय राजकारणात सक्रीय

Published On: 

बंगळूर : देशाचे माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर (जेडीएस)चे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होणार आहेत. त्यांच्या या राजकीय वर्तुळात परत येण्याने आणि अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाल्याचेही दिसत आहे.

पक्षातील आमदार, सोनिया गांधी आणि इतर नेत्यांच्या विनंतीला मान देऊन एचडी देवेगौडा निवडणूक लढण्यासाठी तयार झाले आहेत. विजयाची खात्री झाल्यानंतरच देवेगौडा यांनी निवडणूक लढण्यास होकार दिला आहे.जेडीएसचे 34 आमदार असून, स्वत: देवेगौडा विजयाबाबत साशंक असल्याचे चित्र होते. याचवेळी काँग्रेसने ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विनंती केल्यानंतर देवेगौडा अखेर राजी झाले, असे त्यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

87 वर्षीय देवेगौडा हे या आधीही एकदा राज्यसभेचे सदस्य होते. ते 1996 साली देशाचे पंतप्रधान होते. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला होता. आता राज्यसभा निवडणुकीसाठी ते कॉंग्रेस व जेडीएस आघाडीचे संयुक्त उमेदवार असणार आहेत. यापूर्वी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद देखील भूषविले आहे.

‘शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे’, मुख्यमंत्र्यांनी ठणकावले

कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागा आहेत. येत्या १९ जूनला यासाठी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ९ जून आहे. आणि उद्याच देवगौडा आपला अर्ज दाखल करणार आहेत. कॉंग्रेसकडे या विधानसभेत 68 आमदार असून त्यांना एक जागा सहज जिंकता येणार आहे. जादाची मते देवेगौडा यांना दिली जातील त्यातून त्यांचाही विजय सहज होऊ शकेल. ही निवडणूक जिंकण्यासाठी 44 आमदारांची गरज आहे.

अटींसह लॉकडाऊन मध्ये असलेली शिथिलता म्हणजे मोकळीक नाही – बाळासाहेब थोरात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!