Share

Lonavala- लोणावळा मध्ये अजब प्रकार, नगराध्यक्षांच्या घरासमोर तिरडीचा उतारा

Published On: 

🕒 1 min read

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकण आणि कारण निश्चित करून तसेच मृत्यू यंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरडी याचा उतारा खुद्द त्यांच्याच घराच्या दरावाजापुढे आढळून आला. आज (रविवार) सकाळी ही घटना उघडकीस आली. अंधश्रद्धेचा कळस गाठणारी सदरची घटना असून संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव या त्यांच्या सहकारी नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सध्या केरळ या ठिकाणी गेल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरासमोर असा घृणास्पद आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार घडला आहे.

 

सदर उताऱ्यात एका कागदावर सुरेखा जाधव यांच्या नावाचा उल्लेख असणारे एक मृत्यू यंत्र रेखाटण्यात आलेले आहे. त्यावर जाधव यांच्या मृत्यूची दिनांक, वेळ, ठिकाण आणि कारण या सर्वांचा उल्लेख करण्यात आला आहे. मंगळवारी दि. 25 एप्रिल 2017 सकाळी 11 वाजून 8 मिनिट या वेळेवर तुंगारली येथील नगरपरिषद कार्यालयात जाधव यांचा अटॅकने मृत्यू होणार असल्याचे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे.
लोणावळा पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हा उतारा त्याठिकाणावरून हटवला आहे. याबाबत जाधव यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आपला या असल्या अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास नसल्याचे सांगितले. परंतु असल्या अंधश्रद्धा पसरविणाऱ्या आणि समाजात वाईट गोष्टींचा पायंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कडक पोलीस कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
[jwplayer Snmt8yAu]
नुकत्याच डिसेंबर महिन्यात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत सुरेखा जाधव यांनी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून बाजी मारली आहे. सुरेखा जाधव या शहरात सर्व स्तराच्या जनसामान्यामध्ये लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!