Share

‘या’ जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा एकदा लॉकडाउनचे नियम कडक करण्यात येणार

Published On: 

रत्नागिरी : ‘मिशन बिगीन’ अगेन सुरु असलं तरीही ३० जूननंतर लॉकडाऊन सुरुच राहिल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं. उद्या म्हणजे 30 जून रोजी करोनाप्रतिबंधक लॉकडाउनचा चौथा टप्पा संपणार असल्यानं नियमांमध्ये आणखी शिथिलता मिळेल, असं वाटत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र एक जुलैपासून पुन्हा एकदा लॉकडाउनचे नियम कडक करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली, गृहमंत्र्यांनी थोपटली पाठ

रत्नागिरी जिल्ह्यातल्या करोनाबाधितांची संख्या आता 560 झाली आहे. त्यातल्या 430 जणांना करोनामुक्त झाल्यानं घरी पाठविण्यात आलं आहे. बरं वाटणाऱ्यांचं प्रमाण 77 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र त्यामध्ये सातत्य राहिलेलं नाही. त्यात दररोज चढउतार होत आहे. मृतांचं प्रमाणही वाढतं आहे.

आतापर्यंत 25 जणांचा बळी गेला आहे. ग्रामीण भागातही आता करोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या आजाराचा सामूहिक प्रसार थांबविण्यासाठी येत्या एक जुलैपासून सुरवातीला आठ जुलैपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

तुम्ही बिहार, दिल्ली कडे पहा महाराष्ट्राच्या विकासाचं काय ते आम्ही पाहू, सामनातून गडकरींना टोला

आकाशवाणीने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयांमध्ये सध्या 111 जण उपचार घेत आहेत. हे प्रमाण शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट आता प्रशासनानं ठेवलं आहे. त्यासाठीच ‘ऑपरेशन ब्रेक द चेन` जाहीर करण्यात आलं आहे. सार्वजनिक तसंच खासगी वाहनं, एसटी, दुचाकी, चारचाकी वाहनांना फिरायला पूर्ण बंदी असेल. सायंकाळी पाच ते सकाळी नऊ या वेळेत नाइट कर्फ्यूची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हाबंदीही कायम राहणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!