पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जनता कर्फ्यूच आवाहन केलं आहे.या दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केल्यानंतर पुणे शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील बससेवा आज फक्त पंचवीस टक्के रस्त्यांवर धावणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस कर्मचारी डॉक्टर्स, नर्सेस,अग्निशामक दलाचे कर्मचारी यांच्यासाठी ही सेवा सुरू राहणार आहे मात्र नागरिकांसाठीही सेवा देण्यात येणार नाहीये त्यामुळे पुणे शहरातील ज्या बसेस रस्त्यांवर धावत आहेत त्या संपूर्णपणे रिकाम्या धावत आहेत.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूच्या निमित्तानं पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानक मधील संपूर्ण एसटी सेवा बंद करण्यात आलेली आहे. स्वारगेट एसटी स्थानकामधून आज कुठल्याही मार्गावर एसटी बसेस धावणार नाहीयेत, त्यामुळे नेहमी गजबजणाऱ्या स्वारगेट एसटी स्थानकात अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळतोय.
जनता कर्फ्यूच्या निमित्ताने पुण्यातील मार्केटयार्ड आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. दररोज लाखो नागरिकांची वर्दळ असलेल्या या भागात आज शुकशुकाट पाहयला मिळत आहे.
जनता कर्फ्यूच्या निमित्ताने पुण्यात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय… नागरिक घराबाहेर न पडता एकत्र कुटूंबासोबत आजचा दिवस घालवत आहेत. एकीकडे कोरोनाच संकट असल्यामुळे घरी बसावं लागत असलं तरी सर्व एकत्र आल्याने समाधान असल्याच ते सांगतात. त्याच बरोबर देशातील कोरोना व्हायरसच संकट दूर करण्यासाठी सर्वांनी प्रतीसाद दिल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
इतर वेळी रविवारी सकाळी गजबजलेली पुण्यातील महात्मा फुले मंडई आज मात्र निर्मनुष्य आहे. मंडईतल्या भाजी विक्रेत्यांनी जनता कर्फ्यूला पुर्णपणे प्रतिसाद दिला आहे. भाजीचे स्टाॅल्स सगळे झाकून आहेत. आणि इकडे कुणीच दिसत नाही. सध्यातरी जनता कर्फ्यूला पुर्णपणे प्रतिसाद मिळताना दिसतोय.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

