🕒 1 min read
नवी दिल्ली : लोकडाऊनच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. यानुसार संपूर्ण देशभरातील लॉक डाऊनचा कालावधी हा 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर ग्रीन आणि ऑरेंज झोन मधल्या भागांना सवलती देण्यात आल्या आहेत.
देशात 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. पहिला लॉकडाऊन 21 दिवसांचा होता. तर दुसरा लॉकडाऊन हा 19 दिवसांनी वाढवण्यात आला होता. तर आता पुन्हा केंद्र सरकारकडून 14 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.
https://twitter.com/pti_news/status/1256205358713892866?s=21
केंद्र सरकारने याबाबत नोटिफिकेशन काढले आहे. या नोटिफिकेशन नुसार ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील भागांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तर रेड झोनमध्ये कडक नियम कायम असणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय, मॉल, धार्मिक स्थळं ही बंदचं राहणार आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली होती. यावेळी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन चा कालावधी वाढवावा अशी मागणी केली होती. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात या प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असे मख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

