पुणे : कोरोनाचे देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ६४ वर पोहचली आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता कठोर निर्णय घेत आहेत. यापूर्वी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईतील लोकलमधून रोज लाखो प्रवास ये जा करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका मुंबईत निर्माण झाला आहे. ही परिस्थिती पाहता राज्य सरकारने लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध घालण्यात आले आहेत.
लोकलमधून आता सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नाही.उद्यासून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. आज 22 मार्चपासून 31 मार्चपर्यंत लोकलवर निर्बंध घालण्यात आले आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेशी संबंधित नसणाऱ्यांना उद्या रेल्वे स्टेशनवर प्रवेशच मिळणार नाही. सर्वांना शासकीय किंवा अत्यावश्यक सेवेशी संबंधित असल्याचं ओळखपत्र पाहूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले आहे. त्यालाही चांगलाच प्रतिसाद जनतेने दिलेला दिसत आहे.


