मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. पण ज्यांना मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेता शिव ठाकरेच्या (Shiv Thackeray) आईला तर मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून अश्रू अनावर झाले.
शिवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडीओ शेअर केला. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिवची आई मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत रडताना दिसत आहे. शिवने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “खऱ्या माणसांसाठी खरी माणसं भावूक होतात. जय महाराष्ट्र.”

शिवची आईच नाही तर शिवसैनिक देखील मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून भावूक झाले होते. अनेक लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवने देखील आपल्या आईचा व्हिडीओ चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शिव सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. शिवच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर क्लिक केल्यास तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता.
महत्वाच्या बातम्या :


