पुणे : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मंत्रालयात अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, अनेकांना कामच नाही, असे वृत्त शुक्रवारी प्रकाशित झाले होते. यानंतर त्यावर प्रचंड प्रतिक्रीया उमटल्या. याच पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाली.
तसेच या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यात नको एवढी गंभीर परिस्थिती आली आहे. अशावेळी ठराविक अधिकाऱ्यांना खूप काम द्यायचे आणि काहींना कामच नाही हे चित्र बरोबर नाही, प्रत्येक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जावे लागले तर जिल्ह्यातील यंत्रणेवर प्रचंड ताण येईल’.
‘मंत्रालयात अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांना पोस्टींगच नाहीत तर काही अधिकाऱ्यांकडे दोन विभागांचा पदभार आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्यात असे जेवढे अधिकारी आहेत त्यांना तातडीने काम दिले जाईल, हा माझा शब्द आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, ‘चांगल्या अधिकाऱ्यांना घरी विना कामाचे बसवणे योग्य नाही, यात स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घातले पाहिजे,’ असं काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

