Share

अखेर चीनने माफी मागितली, ली वेनलियांग यांनी दिलेली माहिती आम्ही गंभीरतेने घेतली असती तर….

Published On: 

नवी दिल्ली : चीनमधून संपूर्ण देशात पसरलेला कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण जग या प्राणघातक व्हायरस च्या विळख्यात अडकले आहे. चीनपाठोपाठ इटली, फ्रांस, इराण, इराक, दुबई सारख्या देशात अनेक या व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या व्हायरसची सर्वप्रथम माहिती देणारा चीनमधील डॉक्टर ली वेनलियांग यांच्या म्हणण्यावर चीनने दुर्लक्ष केले नसते तर ही महामारी एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली नसती. चीनला आता त्यांच्या चुकीची जाणीव झाली असून चीनकडून ली वेनलियांग यांच्या कुटुंबीयांची माफी मागण्यात आली आहे.

आता चीनमधील सत्ताधारी पक्ष कॉम्युनिस्ट पार्टीने ली यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. ‘ली वेनलियांग यांनी दिलेली माहिती आम्ही गंभीरतेने घेतली असती तर हा हाहाकार उडाला नसता. आम्ही खूप मोठी चूक केली आहे. ली यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलीसांविरोधात कारवाई केली जाईल, असे पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, चीनमध्ये डिंसेंबर महिन्यात सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लक्षणे दिसली होती. त्यानंतर वूहान शहरातील डॉक्टर वेनलियांग यांनी चीनला सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी वेंगलीयांग यांच्यावर अफवा पसरवत असल्याचा आरोप करत चीनमध्ये दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर काही दिवसातच कोरोनाने चीनमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक लोक या व्हायरसने मृत्युमुखी पडले. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असताना वेंगलीयांग यानाही या रोगाची लागण ली यांना देखील झाली व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!