Share

४० वर्षे दुर्लक्षित ‘या’ तालुक्यात भगवा फडकवण्यासाठी आता कामाला लागा- घोसाळकर

Published On: 

औरंगाबाद : भोकरदन जाफराबाद तालुक्यातील शिवसैनिक गेली चाळीस वर्षे दुर्लक्षित होता. मात्र या पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी करा. मतदारांच्या प्रश्नांचा अभ्यास करून भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा. शिवसैनिकाला संपूर्ण ताकद देण्याचे काम आम्ही करू असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केले.

भोकरदन जाफराबाद विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांच्या पुढाकाराने भोकरदन येथील कमल लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी ते बोलत होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, भोकरदन जाफराबाद मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विधानसभेतील मतदार शिवसेनेच्या पाठीशी कायम राहील.

जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले, पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता मतदार संघातील सर्वसामान्य गोरगरीब दीन दुबळ्यांची कामे करण्याला सुरुवात करा. संघटन मजबूत करण्यासाठी गावागावात शिवसेना, युवासेना, आघाडी यांच्या शाखा स्थापन करा. यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश गगव्हाड, उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, जिल्हा युवा अधिकारी भाऊसाहेब घुगे आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!