टीम महाराष्ट्र देशा : IPL 2020च्या मोसमासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया झाली. या लिलावासाठी एकूण ९७१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून अखेर ३३२ खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम करण्यात आल्या. या लिलावात १८६ भारतीय, १४३ परदेशी तर ३ सलग्न देशातील खेळाडूंचा समावेश आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाने गेल्या हंगामात उपविजेतेपद पटकावले. तर यावेळी पण चेन्नई सुपर किंग्सकडे अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. यंदाच्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने काही खेळाडूंना करारमुक्त केले, काहींना संघात कायम ठेवले. तर काहींना लिलावात विकत घेतले.
हे आहेत चेन्नई सुपर किंग्सने कायम राखलेले आणि लिलावात विकत घेतलेले खेळाडू :
महेंद्रसिंग धोनी, दीपक चहर, सुरेश रैना, शार्दूल ठाकूर, सॅम करन (५.५० कोटी), शेन वॉटसन, रविंद्र जाडेजा, नारायण जगदीशन, लुंगी एन्गीडी, आर साई किशोर (२० लाख), मुरली विजय, मिचेल सँटनर, मोनु कुमार, के. एम असिफ, केदार जाधव, पियुष चावला (६.७५ कोटी), करन शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, फाफ डु प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड, जोश हेजलवूड (२ कोटी).
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

