मुंबई: आज विजयादशमी निमित्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून महाराष्ट्र हा अमृताचा कुंभ आहे. विचारांची खाण आहे. शौर्याचे तेज आहे. शमीच्या झाडावरची शस्त्र याच संपत्तीच्या रक्षणासाठी आहे. महाराष्ट्राचे मन शुद्ध आहे. आजच्या विजयादशमीला त्याच शुद्ध विचारांची सुवर्णपाने वाटूया आणि लुटूया. असे आवाहन शिवसेनेने केले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरूच आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दसऱयाचे सोने लुटायला महाराष्ट्र सज्ज झाला आहे. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी कोळसा टंचाईवरूनही केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. महाराष्ट्रावर ‘लोड शेडिंग’ म्हणजे अंधाराचे संकट कोसळताना दिसत आहे. केंद्र सरकारने कोळशाच्या बाबतीत जो ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार केला, त्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्ये अंधारात ढकलली जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकाएकी ही कोळसा टंचाई का निर्माण झाली? केंद्र सरकारने मर्जीतल्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली की काय? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- … तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते – गुलाबराव पाटील
- महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी
- या हरामखोराला भर चौकात फटके टाकले पाहिजे; निलेश राणेंचा घणाघात
- झेंडूच्या फुलांचा भाव वधारला ; फुलांच्या किंमतीत १८ ते २० टक्क्यांनी वाढ
- केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
