Share

हेरिटेज वॉक प्रमाणेच मुंबईतील किल्ल्यांचा विकास करु – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्त्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मुंबई महापालिका समिती अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, भारताचे अग्रगण्य शहर ही मुंबईची ओळख पुर्वीपासून आहे. साधारण सव्वाशे वर्षापुर्वी अंदाजपत्रकापेक्षा कमी किंमतीत आणि कमी वेळेत महापालिकेची ही वास्तू बांधून पूर्ण करण्यात आली. इतकी वर्षे होऊनही आजही इमारत मजबुत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी हे काम निश्चितच आदर्शवत असे आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना सध्या आपण काही ठराविक पर्यटनस्थळे दाखवतो. यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. आज मुंबई महापालिकेच्या हेरीटेज वॉकची त्यात भर पडली आहे. याच पद्धतीने मुंबईतील किल्ल्यांचा विकास करुन तेथील पर्यटनालाही चालना देता येईल. फिरोजशहा मेहता यांच्यासह अनेक महापुरुषांनी या इमारतीतून मोठे योगदान दिले आहे. उपक्रमामुळे या सर्व महापुरुषांचा इतिहास आणि त्यांचे कार्य सर्वांना माहित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!