Share

आम्हाला घरी जाऊद्या ! सुरतमध्ये मजुरांनी एकत्र येत पुन्हा केली निदर्शने

Published On: 

सुरत : सुरतमध्ये आज पुन्हा अडकून पडलेल्या मजुरांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी मजुरांनी आम्हाला आमच्या घरी जाऊद्या अशी मागणी केली. यावेळी शेकडोच्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले होते. तर यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मजुरांनी एकत्र येत घरी जाण्याची मागणी करण्याची ही सुरतमधील चौथी वेळ आहे.

सूरतच्या सीमेवर वसलेल्या वरेली येथील बाजारपेठेत निदर्शक कामगार एकत्र आले. कामगारांनी पोलिसांवर दगडफेकही केली, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुंद गोळीबार केला. सुरतच्या पालनपूर पाटिया भागातही कामगारांनी निदर्शने केली.

विशेष म्हणजे गृह मंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशा येथील शेकडो परप्रांतीय कामगारांनी शुक्रवारसाठी सूरतहून घरी परत जाण्यासाठी प्रवास सुरू केला. तथापि, इतर राज्यांतील लोकांना येथे काही काळ थांबावे लागेल.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार 25 मार्चपासून सुरु आहे. यासाठी देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. त्यानंतर शहरात अडकलेल्या कामगारांचे हिंसक निदर्शने केली तर आपापल्या राज्यात परत जाण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. शुक्रवारी प्रशासनाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशा येथील कामगारांना येथून निघण्याची परवानगी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!