मुंबई : भाजपने वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढा हा आपला बालेकिल्ला गमवावा लागला होता.
सोलापूर: भाजपकडून कार्यकर्ते वाऱ्यावर, पदे असलेल्यांनाच पुन्हा संधी
धनगर समाजाचे नेते आणि लोकसभेत वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढले होते. तेथे ते लढण्यास इच्छुक नव्हते. त्यांना तेव्हाच विधान परिषद किंवा राज्यसभा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते आता पूर्ण करण्यात आले. पडळकर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात. धनगर समाजातील तरुणांमध्ये ते चांगले लोकप्रिय आहेत. त्यामुळे पडळकर यांना संधी देतानाच धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना शह देण्यात आल्याचे मानले जाते. जानकर हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
सट्टेबाजारातही भाजप – सेना महायुती तेजीत तर महाआघाडी पिछाडीवर
दरम्यान, संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्याने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल. भाजपने तर तसे संकेत आधीच दिले आहेत. नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता असेल. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावावर १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते.
चव्हाणांना मतदारसंघात कोरोनाबद्द्ल जाणवल्या अनेक अडचणी; मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ मागण्या
भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे ११२ मते आहेत. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपला चौथी जागा निवडून आणण्याकरिता चार मते कमी पडत असली तरी गुप्त मतदान असल्याने ही मते मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असे भाजपचे नेते ठामपणे दावा करतात.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
