Share

‘संकट आल्यावर महाराष्ट्र सोडून जाणं चुकीचं’ ; राज यांची घरी जाणाऱ्या परप्रांतीयांवर टीका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा –  महाराष्ट्रावर कोरोनाच संकट आलेलं असताना परराज्यातील लोकं ज्या राज्यामध्ये पैसे कमवले त्या राज्याला संकटात टाकून आपल्या राज्यात जाण्याचा विचार करत असतील तर ते चुकीचं आहे, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

ज्या राज्यामध्ये इतके वर्ष राहिले त्या राज्याचे न होता संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं राज ठाकरे यांनी आहे. ABP माझा वृत्तवाहिनीला महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

महाराष्ट्रात राहून पैसे कमवले आणि संकट आल्यावर निघून जातात. आता हे लोकं निघून गेल्यावर यांची कामं कोण करणार. महाराष्ट्राने परराज्यातून येणाऱ्या लोकांवर अलंबून राहण्यावर विचार करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येऊ नये असं माझं म्हणणं नाही. मात्र आधी मान खाली घालून येणार आणि नंतर मान वर करुन दादागिरी करणार हे चालणार नाही. खपवून घेतलं जाणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!