🕒 1 min read
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ९ ऑगस्टपासून नागपूरच्या शहीद चौकात विदर्भ स्तरीय बेमुदत ठिय्या देणार आहे. आंदोलनाची मशाल पेटवून आता आरपारची लढाई लढण्यात येणार असल्याचे विदर्भ आंदोलनाचे राम नेवले यांनी सांगितले.
भाजपने दिलेले विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन ९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे अन्यथा ९ ऑगस्टपासून ‘भाजपा सरकार चले जाव’ हे आंदोलन सुरू होणार आहे. विदर्भातील गल्ली बोळीपर्यंत गाव मोहल्ल्यापर्यंत या आंदोलनाची मशाल पेटून आंदोलनाची धग तीव्र करण्यात येईल असे राम नेवले यांनी सांगितले.
विदर्भ राज्याच्या मागणीस बगल
१९९७ मध्ये भुवनेश्वर येथील कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने वेगळ्या विदर्भाचा ठराव घेतला होता. अटलजींनी उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या तीन राज्यांची निर्मिती केली. परंतु विदर्भ राज्य दिले नाही. विदर्भाच्या जनतेवर भाजपने त्यावेळी अन्याय केला. २०१४ मध्येही भाजपने दिलेले आश्वासन पाळले नाही. केंद्राला राज्य निर्मितीचे अधिकार असतानाही या मागणीकडे भाजप नेते दवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुर्लक्ष केले. ६० वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसने विदर्भ राज्य दिले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पक्षांनी विदर्भातील नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिवसाला शंभर गुन्हे दाखल करा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात मी बोलणारच!’
- ‘चित्रा वाघ यांनी मला बलात्कारी म्हटले, माझी बदनामी केली’, मेहबूब शेख यांची पोलिसांत तक्रार
- ‘तळाच्या फलंदाजानी केलेल्या २०-३० धावांही निर्णायक असतात’, अजिंक्य रहाणे
- ‘या’ कारणामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध
- मराठा समाजासाठीची ३६ पैकी १४ वसतीगृहे सुरु; अशोक चव्हाणांनी दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

