टीम महाराष्ट्र देशा : पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रतीक्षा अवलंबून असल्यामुळे पालकाच्या पिकाला नत्राचा मोठया प्रमाणावर वापर करावा लागतो.
तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करुन जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे. पालकाच्या पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार हेक्टरी 20 गाडया शेणखत 80 किलो नत्र 40 किलो स्फूरद आणि 40 किलो पालाश द्यावे.
शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फूरद आणि पालाश 1/3 नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र 2 समान भागांत विभागातून पहिल्या आणि दुस-या कापणीच्या वेळी द्यावे. ज्या जातीमध्ये दोन पेक्षा जास्त कापण्या करता येतात तेथे प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी 20 किलो नत्र द्यावे.
पानातील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बी उगवून आल्यानंतर 15 दिवसानी आणि प्रत्येक कापणी नंतर 1.5 टक्के युरिया फवारावा. बियांच्या पेरणीनंतर लगेच पाणी दयावे किंवा वापसा आल्यानंतर पेरणी करावी.
त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पिकाला नियमित पाणी दयावे. हिवाळयात पालकाच्या पिकाला 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्या 2-3 दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1185127420124254210?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1185127143316934656?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

