नाशिक : मागील आठवड्यात गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सिन्नर शहर व परिसरात घरांचे, दुकानांचे अंशत:, पूर्णत: नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी दौरा केल्यानंतर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सिन्नर दौऱ्यावर आहेत.
यावेळी दानवे यांनी सिन्नर तालुक्यातील काही गावांतील शेतावर जाऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. तसेच नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. दरम्यान सिन्नर परिसरात अनेक भागात ढगफुटीचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. सिन्नरच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने अद्यापही अनेक व्यावसायिक स्वच्छता करण्यात व्यस्त आहेत. असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Shardul Thakur । शार्दुल ठाकूरचा भारतीय संघात समावेश, या प्रमुख गोलंदाजाची जागा घेतली
- Tanaji Sawant । तानाजी सावंत गेलेल्या मार्गाचे शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण
- Ramdas Athawale | मनसेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सोबत घेण्याची गरज नाही – रामदास आठवले
- Neelam Gorhe ।अमित शहांना खरी शिवसेना कोण आहे हे चांगल माहितीये; गोऱ्हे यांचा खोचक टोला
- Ramdas Athawale | उद्धव ठाकरेंनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यावा – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

