🕒 1 min read
तुळजापूर: शाकंभरी नवराञोत्सव व सलग आलेल्या सुट्यांचा पार्श्वभूमीवर आज तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आज शाकंभरी नवराञोत्सवाचा चौथ्था माळेदिवशी देवीची सिंहासनावर मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली होती. यावेळी सकाळी देविजींना पंचामृत शुध्द स्नान घातल्यानंतर शाकंभरी नवराञोत्सवातील सिंहासन महापुजासंपन्न झाल्या नंतर वस्ञोलंकार घालण्यात आले.
रविवारी पहाटे पासुनच भाविकांनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ गर्दी केली होती. सकाळी मोफत दर्शन पासेस संपल्यानंतर श्रीमंत भाविकांनी प्रति भाविक तीनशे रुपये पेडदर्शन पास घेवुन देवीदर्शन केले. तर गोरगरीब वारकरी भाविकांनी माञ राजमाता जिजाऊ महाव्दारामधुन दर्शन घेतले पेडदर्शन पासेस काऊंटर दिवस भर सुरु होते.

दुपारी पेडदर्शन पास वाल्यांना देवीदर्शन घेण्यासाठी दोन तासाच्या वर लागत होते तर मोफत दर्शन पासेस संपल्याने दर्शन मंडप भाविका विना दुपारी सुना होता. तिर्थक्षेञ पंढरपूर येथील पुञदा ऐकादशी दिनी विठुरायचे दर्शन घेतलेले वारकरी दुपारी तुळजापूर मध्ये आले. त्यांनी ही महाव्दारामधुन हात जोडुन बाहेरुन दर्शन घेतले. देवीदर्शन नंतर भाविकांनी प्रसाद साहित्य देविची मुर्ती फोटो खरेदी साठी बाजार पेठेत गर्दी केली होती. भाविक मोठ्या संखेने खाजगी वाहनांनी आल्यानै वाहनतळवाहनांनी भरुन गेले होते लाँज धर्मशाळा खाजगी निवासस्थानातील रुम भाडे आज वाढले होते.
हा भाविकांचा ओघ असाच प्रजासत्ताक दिना पर्यंत राहणार असल्याने प्रजासत्ताक दिनापर्यंत भाविकांनी तुळजाईनगरी गजबजुन जाणार आहे. सांयकाळी देविजींना शुध्द स्नान घालुन नंतर सिंहासन पुजा करण्यात आल्यानंतर देविजींना वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर नित्योपचार करण्यात येवुन मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आला नंतर प्रक्षाळपुजा होवुन शाकंभरी नवराञोत्सवावातील चौथ्था माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा मराठा विद्यार्थ्यांसोबत विरोधी पक्षनेते उपोषणाला बसणार !
- कोरोना पूर्ण जात नाही तोपर्यंत परीक्षा ऑनलाइनच घेतल्या जातील – उदय सामंत
- ‘एल्गार परिषदेचे ना वक्ते माहित ना परिषदेचा उद्देश मग पोलिसांनी परवानगी कशी काय दिली?’
- यंदा लाल रंगाच्या कपड्यातील अर्थसंकल्पाची परंपरा मोडणार !
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळकेंनी राम मंदिर निर्माणासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

